मनोहर उर्फ मामा भोसलेंना बार्शी सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला, अनं भक्तांचा जीव भांड्यात पडला
श्रीगोंद्याचे ऍड.रोहित गायकवाड व बारामतीचे ऍड.रणजीत गावडे यांच्या युक्तीवादाने मामांचा जामीन मंजूर
बारामती(वार्ताहर): मनोहर उर्फ मामा भोसलेंना महिलेवरील अत्याचार केल्या प्रकरणी बार्शी सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला अनं भक्तांचा जीव भांड्यात पडला. पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मामाचा जामीन मंजूर करताना न्यायालयाने फिर्यादी महिलेच्या सातारा जिल्ह्यात जाण्यासाठी मनाई केली आहे.
श्रीगोंद्याचे ऍड.रोहित गायकवाड व बारामतीचे ऍड.रणजीत गावडे यांच्या युक्तीवादामुळे मामांना जामीन मंजूर झाला.
आपला इतिहास साक्ष देतो की, शिर्डीचे साईबाबा, संत तुकाराम, विठ्ठलाचे भक्त पुंडलिक यांच्यासारख्या अने संत, महात्मे व भक्तांना त्रास झाला तर मनोहर उर्फ मामा एकमेव अपवाद कसे ठरतील अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.
मनोहर भोसले उर्फ मामा यांनी स्वत:चे सामर्थ किंवा योग सामर्थ वापरून काही आश्र्चर्य वाटेल असे करीत असतील किंवा योगसिद्धीतून अंत:करण जाणणे म्हणजे बुवाबाजी म्हणता येईल का? मामाच्या कामातून संबंधीत व्यक्ती वाम मार्गाला तर लागत नाही तो स्वत: सुधारणावादी होवून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सुधारण्याची संधी उपलब्ध करून देतो असे भक्तांमध्ये बोलले जात आहे.
मामांचा वाढता प्रेमी, समुह पाहुन प्रथमत: हे सर्व जवळचे, घरातले, पै-पाहुणे, मित्रपरिवार यांना पहावत नाही. ‘हे पाहण्यापेक्षा डोळे जळल्यालं बर!’ असं त्यांच्या मनोमन वाटत असावे. पण काहींनी ‘अडली गाय अन् फटके खाय’ असे करून ठेवले होते. यामुळे मामा ‘आगीतून निघून फुफाट्यात पडले’ खरे पण त्यातून सुद्धा ते सावरले. ‘आभाळ फाटल्यावर ठिगळ कसं लावायचे’ हा यक्ष प्रश्र्न समोर होता.
आपण ‘शेण खायचं अन् दुसर्याचं तोंड हुंगायचे’ अशा काही वाईट प्रवृत्ती लोकांमुळे मामांवर संकट आले. ‘ऊन पाण्याने कुठं घर जळत नसते राव’ असेही बोलले जात आहे.
संत तुकाराम महाराजांनी चांगले विचार मांडले आहेत.
करिता देवार्चन।
घरा आले संतजन।।
देव सारावे परते।
संत पुजावे आरते।।
संतांचा अपमान करून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून देवपूजा करणे हा अधर्म आहे. अशाप्रकारे पुजा करत असाल तर उच्चारलेले मंत्रोच्चार आणि देवाशिरी टाकलेली फुलं देवाला आपल्या डोक्यात दगड घातल्याप्रमाणे वाटतात. दारी आलेल्या अतिथीला माघारी पाठवून देवाला नैवद्य जर देत असाल तर तुम्ही करत असलेली देवाची सेवा शून्य ठरल्याशिवाय राहत नाही.
मामांमुळे एखाद्या वैद्याचा, बुवाबाजी आणखी अघोरीकृत्य करणार्यांचा धंदाच बसत असेल तर मामांच्या प्रत्येक कामाला विरोध होणारच ही काळ्या दगडावरील रेष आहे. ज्याप्रमाणे शिर्डीच्या साईबाबांना शेवटपर्यंत विरोध करणार्या वैद्याचा झाला.
‘अशक्यही शक्य करतील स्वामी’ अशी कोट्यावधी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. या स्वामींनी सुद्धा सदगुरूंशी एकनिष्ठ राहण्याचा बोध दिला आहे.
भक्तांमध्ये सुद्धा प्रकार असतात मामा ज्ञानी भक्तात मोडले जातात. ज्ञानी ज्यावर भक्ती करतात त्यांचा आत्मा म्हणून त्यास संबोधले जाते. प्रभू ज्ञानीला आपली आत्मा म्हणतात.
देवाचीच नाही तर देशाची आणि एखाद्या थोर माणसाचीही भक्ती करता येते फक्त एवढेच ही भक्ती धार्मिक नसते. अशीच अखंड भक्ती मामांवर असणारे भक्त समाजात आहेत. एखादे संकट आल्यावर घरातील देव पाण्यात ठेवतात त्याप्रमाणे काही भक्तांनी सुद्धा केले होते. काही भक्तांनी तर रात्रीचा दिवस सुद्धा केला एवढे निस्सीम प्रेम करणारे भक्त सर्वांना मिळो. मामांनी स्वत:चे सामर्थ असे टिकवून ठेवावे अशी नागरीकांतून मागणी होत आहे.