बारामती(वार्ताहर): येथील मानवी हक्क संरक्षण व जागृती बारामती तालुका अध्यक्ष वस्ताद अस्लम शेख यांच्या वतीने देशाचे भाग्यविधाते खा.शरदचंद्रजी पवार साहेब कोरोनातून लवकर मुक्त होण्यासाठी हजरत चॉंदशाहवली दर्ग्याला चादर अर्पण करण्यात आली.
डॉ.देवकाते हॉस्पीटलच्या बाहेर चहा विक्री करणारा अस्लम शेख हा सर्वसामान्य अल्पसंख्यांक कुटुंबातून आहे. पवार साहेबांनी त्यांच्या जीवनात केलेल्या कामाचा आदर्श जीवन व्यथित करताना, पावलोपावली हक्काची जागृती व संरक्षण करणारा आहे. साहेबांनी मानवाचे हक्क अबाधित राहण्यासाठी काम केले आहे. महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण होण्यासाठी प्रयत्न केला आहे. नुकतेच कोरोनाने त्यांना जखडले आहे, त्यातून सुद्धा ते नक्कीच बाहेर येतील त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी दर्ग्याला चादर चढविण्यात आली व प्रार्थना करण्यात आली. यावेळी अस्लम शेख, कृष्णा जेवाडे, अमीन शेख व लखन दामोदरे उपस्थित होते.