बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभद्र वर्तन केल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा कामगार आघाडीचे उपाध्यक्ष संजय दराडे व इतर कार्यकर्त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दि.16 जानेवारी रोजी नाना पटोले यांनी मै मोदी को मार भी सकता हूँ, गाली भी दे सकता हूँ, इसलिए मेरे लिखाफ प्रचार मे नही आते अशा प्रकारचे अपशब्द भंडारा येथे नागरीकांसमोर केले.
पटोले यांचे हे बोलणे अनैतिक व असवैधानिक असून अशाप्रकारे उत्तेजीत संभाषण करून जनतेला भडकविण्याचे काम त्यांनी केले. देशाच्या पंतप्रधानाबद्दल असे उद्गार काढणे म्हणजे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे व जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बोलले तर त्वरीत एफआयआर दाखल होते. नारायण राणे यांनी थोबाडीत मारीन असे वक्तव्य केले तर गुन्हा दाखल होतो. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलले तर त्वरीत गुन्हा दाखल होतो मग देशाचे पंतप्रधान यांचे घटनात्मक पद नाही का? असा प्रश्र्न सर्वसामान्य नागरीकांना पडलेला आहे.
निवेदन देते समयी भाजपाचे सो.मि.प्रदेश सहसंयोजक, सो.मी.अनु.जा. मोर्चा पुणे ग्रामीण चे संयोजनक सचिन मोरे, अनु.जा.मोर्चा पुणे ग्रामीण चिटणीस साजन अडसुळ, ओंकार दराडे, रोहन पडकर इ. कार्यकर्ते उपस्थित होते.