बारामती(वार्ताहर): बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने दि.30 जानेवारी 2022 रोजी स.10 वा.59 मी. ते 11 वाजू 2 मी. हुतात्मा स्तंभ, वंदेमातरम् चौक (भिगवण चौक) याठिकाणी हुतात्मा दिन पाळण्यात येणार असल्याचे उत्तराधिकारी संघटनेचे निलेशभाई कोठारी यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
सर्व स्तरातील व तळागाळातील घटकांनी हुतात्मा दिनास राष्ट्रीय पोशाखात 15 मी. अगोदर उपस्थित रहावे. 30 जानेवारी 1948 मध्ये प्रार्थना सभेत महात्मा गांधी यांची हत्त्या करण्यात आली.त्यांचा स्मृतिदिना दिवशी हुतात्मा दिन म्हणून सर्वत्र ओळखला जातो. सन 1949 पासुन दरवर्षी बारामतीत हुतात्मा दिन पाळला जात आलेला आहे.