गोपालन संस्थेत मे.कोर्टाच्या आदेशान्वये पोलीस नोटीस बजावण्यास गेले! गोरक्षक सदाशिव कुंभार सह दोघांनी धक्काबुक्की करीत अंगावर धावून आले!!

फलटण(वार्ताहर): पोलीस कसायांना सामील आहेत का? गोवंश कायद्याची कार्यवाही न करणारे उत्तरदायी प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकावे, गोवंशहत्तेची माहिती मिळूनही पोलीस दुर्लक्ष करतात इ. सारखे नाना प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करणार्‍या गोरक्षकांकडून चक्क पोलीसांना धक्काबुक्की, शिवीगाळ व अंगावर धावून जाण्याचा प्रकार होत असेल तर हे गोरक्षक आहेत की, पोलीस भक्षक अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

याबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.21 जानेवारी 2022 रोजी दुपारी 1.40 वा.चे सुमारास श्री सद्गुरू यशवंत बाबा गोपालन संस्था झिरपवाडी, ता.फलटण या संस्थेचे इमारतीचे दर्शनी बाजूचे भिंतीलगत पो.ह.साबळे व पो.ना.घाडगे हे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोा., फौजदारी न्यायालय फलटण यांचेकडील दि.20 जानेवारी 2022 चे पत्र इसमनामे सदाशिव जालिंदर कुंभार (रा.झिरपवाडी, ता.फलटण, जि सातारा) यांना दोन पंचासमक्ष बजावणी करीत असताना, कुंभार यांनी घेणेस नकार दिल्याने सदर नोटीस नमूद संस्थेच्या इमारतीचे दर्शनी बाजूचे भिंतीवर दोन पंचासमक्ष डकवत असताना पो.ह.साबळे व पो.ना.घाडगे यांना शिवीगाळ दमदाटी करीत, फलटणचे पोलीस हरामखोर आहेत ते मला सारखेच संस्थेवर येवून त्रास देतात मी त्यांच्याकडे बघून घेतो असे म्हणून पो.ना. घाडगे यांचे अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करून त्यांचे अंगावरील सरकारी गणवेशाचे उजवे बाजूचे खांदयावरील लुप्स मुठीत धरून हिसका मारून त्यामधील स्टीलचे महाराष्ट्र पोलीस बॅच तोडले. कुंभार समवेत असणारी दोन अनोळखी मुले पोलीस करीत असलेल्या कार्यवाहीचे फोटो व विडिओ शुटींग काढणेच्या निमित्ताने पोलीस करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा करीत होते.

त्यामुळे सदाशिव जालिंदर कुंभार व त्यांच्या सह असणार्‍या दोन मुलांवर भा.द.वि.कलम 353, 188, 34 प्रमाणे फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद पो.ह.बबन साबळे यांनी दिली आहे. याबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.21 जानेवारी 2022 रोजी दुपारी 1.40 वा.चे सुमारास श्री सद्गुरू यशवंत बाबा गोपालन संस्था झिरपवाडी, ता.फलटण या संस्थेचे इमारतीचे दर्शनी बाजूचे भिंतीलगत पो.ह.साबळे व पो.ना.घाडगे हे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोा., फौजदारी न्यायालय फलटण यांचेकडील दि.20 जानेवारी 2022 चे पत्र इसमनामे सदाशिव जालिंदर कुंभार (रा.झिरपवाडी, ता.फलटण, जि सातारा) यांना दोन पंचासमक्ष बजावणी करीत असताना, कुंभार यांनी घेणेस नकार दिल्याने सदर नोटीस नमूद संस्थेच्या इमारतीचे दर्शनी बाजूचे भिंतीवर दोन पंचासमक्ष डकवत असताना पो.ह.साबळे व पो.ना.घाडगे यांना शिवीगाळ दमदाटी करीत, फलटणचे पोलीस हरामखोर आहेत ते मला सारखेच संस्थेवर येवून त्रास देतात मी त्यांच्याकडे बघून घेतो असे म्हणून पो.ना. घाडगे यांचे अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करून त्यांचे अंगावरील सरकारी गणवेशाचे उजवे बाजूचे खांदयावरील लुप्स मुठीत धरून हिसका मारून त्यामधील स्टीलचे महाराष्ट्र पोलीस बॅच तोडले. कुंभार समवेत असणारी दोन अनोळखी मुले पोलीस करीत असलेल्या कार्यवाहीचे फोटो व विडिओ शुटींग काढणेच्या निमित्ताने पोलीस करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा करीत होते.

त्यामुळे सदाशिव जालिंदर कुंभार व त्यांच्या सह असणार्‍या दोन मुलांवर भा.द.वि.कलम 353, 188, 34 प्रमाणे फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद पो.ह.बबन साबळे यांनी दिली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी व विनोबा भावे यांनी म्हटले की, गोरक्षण कायद्याची मागणी धार्मिक अंगाने नव्हे तर शास्त्रीय, आर्थिक अंगानेच केली पाहिजे. या सर्वांचा शेतकर्‍यांना फायदा कसा होईल हा दूरदृष्टीकोन होता. यांच्या काळात 100% शेती गाय-बैलांवर व शेणखतावर अवलंबून होती त्यामुळे त्यांनी कायदा करण्यासाठी आग्रह धरला होता. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टर व खतांचा प्रचंड वापर होत असल्याने शेती गाय-बैलांवर फारशी अवलंबून राहिलेली नाही. सरकारने गोवंशहत्याबंदीचा कायदा मुख्यत: धार्मिक अंगाने लादला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर भाकड व न पोसता येणार्‍या गुरांचा भार पडतो आहे याचा परिणाम शेतकर्‍यांच्या आर्थिक उत्पन्नावर पडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!