अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी विजय दत्तात्रय इंगुले यांची एकमताने निवड करण्यात आली.
मल्हारी मार्तंड यांच्या आशीर्वादाने श्रीक्षेत्र जेजुरी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश जाधव व वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष जाधव उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी करण(आण्णा) सुनिल इंगुले, महाराष्ट्र उपाध्यक्षपदी पंकज निकोडेपाटील व पुणे जिल्हा युवकाध्यक्षपदी आकाश संजय पलंगे यांची निवड करण्यात आली.
श्रीक्षेत्र जेजुरी संस्थान प्रमुख विश्र्वस्तपदी पंकज निकाडेपाटील व बारामती सहकारी बँकेच्या संचालकपदी विजयराव गालिंदे यांची निवड झाल्याने त्यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष जाधव यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले. समाजाचा इतिहास सांगत नवनियुक्त पदाधिकार्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष अमृताताई घोणे, प्रदेशाध्यक्ष रमेश जाधव, समाजाचे नेते प्रविण गालिंदे, संदीप घोणे, अमर कांबळे, देवेंद्र कांबळे, सागर पलंगे, प्रद्युम्न गालिंदे, पार्थ गालिंदे तसेच जेजुरी, सासवड फलटण, इंदापूर, दौंड, बारामती, मोरगाव, पुणे इ. ठिकाणाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.