अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): सामाजिक कामात उल्लेखनिय कार्य करणार्या मौर्य क्रांती संघाच्या इंदापूर शहर अध्यक्षपदी प्रकाश उर्फ पप्पू पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग घेऊन जनतेच्या अडीअडचणी जाणून घेऊन, उपस्थित प्रश्र्न मार्गी लावण्यासाठी सतत आघाडीवर प्रकाश पवार असतात या सर्व कामे पाहुन त्यांची निवड सार्थ असल्याचे मौर्य क्रांती संघाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.
बहुजन मुक्ती पार्टी (बीएमपी) चे राष्ट्रीय महासचिव ऍड.राहुल मखरे यांच्या संकल्पनेतून मौर्य क्रांती संघ प्रदेशाध्यक्ष चंद्रसेन लहाडे, महासचिव प्रताप पाटील यांच्या आदेशानुसार प्रभारी बलभीम मथिले, प्रदेश संघटक राहुल शिंगाडे यांच्या कल्पनेतून श्री.पवार यांची एकमताने निवड करण्यात आली.
श्री.पवार निवडीनंतर बोलताना म्हणाले की, मौर्य क्रांती संघाने निर्धारित केलेल्या नितीनियम व अनुशासन राहून काम करणार आहे. कोणतेही निर्णय घेताना राज्य व जिल्हा पदाधिकारी व कार्यालयाची मान्यता घेतल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल.
श्री.पवार यांची निवड झाल्याची वार्ता समजताच विविध ठिकाणांहून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सदरचा कार्यक्रम शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करीत सोशल डिस्टन्स्, सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पाडण्यात आला. यावेळी नानासाहेब चव्हाण, अमोल मारकड, राहुल शिंगाडे उपस्थित होते.