कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्या आक्रमक भूमिकेमुळे इंदापूरचे कॉंग्रेस भवन कोणाचे याचा उलघडा झाला

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): गेल्या तीन वर्षापासून बंद अवस्थेत असलेले इंदापूरचे कॉंग्रेस भवन आमदार संजय जगताप यांच्या आक्रमक भूमिकेमुळे इंदापूर तालुक्यातील नागरीकांना हे कॉंग्रेस भवन कोणाचे? या पडलेल्या प्रश्र्नातून बाहेर काढले. कॉंग्रेस भवनाचे कुलूप तोडून शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर कॉंग्रेसचे आमदार तसेच कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप तसेच इंदापूर कॉंग्रेस कमिटीने आक्रमक पवित्रा घेतला.

स्वर्गीय शंकरराव पाटील यांनी इंदापुर मध्ये कॉंग्रेस भवन बांधण्यासाठी अतिशय परिश्रम घेतले होते. त्यांच्या पश्चात कॉंग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून या कॉंग्रेस भावनांमध्ये सामान्य जनतेची कामे पार पडत होती. परंतु गेल्या दोन वर्षापासून हर्षवर्धन पाटील यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे हे कॉंग्रेस भवन धूळ खात पडले होते. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व आमदार संजय जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत इंदापूर कॉंग्रेस भवनचे कुलपे तोडून धूळ खात पडलेल्या कॉंग्रेस भवन मध्ये प्रवेश करून एका आठवड्याच्या आत त्या कॉंग्रेस भवनची पूर्णपणे डागडुजी करून सामान्य जनतेच्या सेवेसाठी तयार करणार असल्याचे यावेळी कॉंग्रेसचे आमदार तसेच पुणे जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष संजय जगताप यांनी सांगितले.

आमदार संजय जगताप यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे इंदापूर मधील भाजप व कॉंग्रेस कमिटी आमने-सामने आले होते. या भवनाची सविस्तर चर्चा करण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आ. संजय जगताप इंदापूर पोलीस स्टेशन येथे बैठकीला बसले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!