अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): येथील पंचायत समिती कोरोनाच्या विळख्यात सापडली असून, येथील तब्बल 18 कर्मचार्यांना कोरोनाने जखडले आहे. बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पाठोपाठ दोन दिवसांपूर्वी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट सुद्धा पॉझिटीव्ह आले आहेत.
श्री.परीट यांच्या संपर्कामध्ये आलेल्या सर्व कर्मचार्यांना आपली कोरोना टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज इंदापूर पंचायत समितीतील सर्व कर्मचार्यांची व पंचायत समितीत कामानिमित्त येणार्या नागरिकांची पंचायत समितीच्या गेटच्या बाहेरच कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यामधे पंचायत समितीतील तब्बल 18 कर्मचारी व अनेक नागरिक सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आले असून ही तपासणी संध्याकाळ पर्यंत चालू राहणार असल्याची माहिती सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ.रामचंद्र शिंदे यांनी दिली आहे.