अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): अजिंक्य जावीर हे सामाजिक कार्यात सतत हिरीरीने भाग घेत असतात त्यांच्या कार्यात भारतीय जनता पार्टी सदैव पाठीशी राहील असे प्रतिपादन माजी मंत्री व भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.
अजिंक्य जावीर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात श्री.पाटील बोलत होते. यावेळी नगरसेवक भरत शहा, ऍड. राहुल मखरे, पै.रमेश शिंदे, नगरसेवक कैलास कदम, शकील सय्यद, माजी नगरसेवक पांडुरंग शिंदे, ललेंद्र शिंदे, सुनील आरगडे, राजाभाऊ इंगळे, प्रतिक सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.
श्री.पाटील पुढे बोलताना म्हणाले की, युवकांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील असणारे व्यक्तिमत्व म्हणजे अजिंक्य जावीर आहेत. सामाजिक जाणिवेतून त्यांनी अनेक उपक्रम राबविले व सहभाग दर्शविला. कोरोना काळात त्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. युवक संघटनेत ते सक्रिय सहभागी असतात. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.