दौंड(वार्ताहर): पुणे जिल्हा समाजकल्याण दक्षता समितीचे सदस्य साधु बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड शहर पोलीस स्टेशनला दक्षता नियंत्रण समितीची आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सामाजिक न्याय विभागाचे दौंड शहराध्यक्ष दीपक सोनवणे, राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे बारामती तालुका उपाध्यक्ष पैगंबर शेख, संजय मांढरे काळू शिंदे इ. मान्यवर उपस्थित होते.
अनुसूचित जाती जमाती संलग्न असणार्या कामाची माहिती यावेळी घेण्यात आली. चुकीच्या पद्धतीने ऍट्रॉसिटी गुन्हे दाखल होत असतील तर त्याची शहानिशा करून अन्याय ग्रस्ताला न्याय मिळवून दिला पाहिजे असे सूचित करून स्वार्थापायी होणार्या गुन्ह्यावर सदरील समिती नियंत्रण ठेवणार आहे. खरंच एखाद्या कुटुंबावर अन्याय झाला असेल तर समिती कायदेशीर योग्य ती मदत करेल असेही बल्लाळ यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये ही नियंत्रण समिती बैठक घेऊन सर्व जातीय सलोखा, भाईचारा अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
पो.नि.घुगे सांगितले की, प्रत्येक गुन्ह्याची पडताळणी करून पुढील कारवाई केली जाईल खरंच जर एखाद्या गोर-गरीब कुटुंबावर अन्याय होत असेल तर त्याची गय केली जाणार नाही.