कर्जत(वार्ताहर): येथील नगरपंचायतीवर आ.रोहित पवारांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राम शिंदेंना नगरपंचायत सुद्धा टिकवता आली नसल्याचे नागरीकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथुन भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसलेला आहे. नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी आ.रोहित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पुरस्कृत उमेदवारांचा 11 जागांवर विजय मिळवीत एक जागा बिनविरोध विजय झालेला आहे. राष्ट्रवादीने एकुण 12 जागांवरील विजय मिळविला तर राम शिंदे यांच्या पारड्यात फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. कॉंगे्रसला 3 जागांवर विजय मिळविला आहे. महाविकास आघाडीचा तब्बल 15 जागांवर घवघवीत विजय प्राप्त केला आहे.
कर्जत नगरपंचायतीमध्ये राम शिंदे व रोहित पवार यांच्यात समोरासमोर लढत होती. आरोप-प्रत्यारोपामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले होते. राम शिंदेंनी सर्वाधिक प्रतिष्ठा पणाला लावली होती मात्र, मतदारांनी त्यांना दोन जागेवर समाधान मानण्यास लावले.