अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या पुणे जिल्हा युवकाध्यक्षपदी अभिजीत काळे

योग्य व्यक्तीला पद दिल्याने युवकांमध्ये आनंदाचे वातावरण

बारामती(वार्ताहर): बारामती येथे अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या पुणे जिल्हा युवक अध्यक्षपदी माजी नगरसेवक अभिजित भिमराव काळे यांची महाराष्ट्र राज्याचे युवक प्रदेश अध्यक्ष किशोर मासाळ यांनी नियुक्तीचे पत्र देवून पुणे जिल्ह्यात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

युवकांचे संघटन कौशल्य असणार्‍या व्यक्तीला जिल्हा युवकचे पद दिल्याने सर्व युवकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तात्यासाहेब देडे, युवकचे कार्याध्यक्ष सचिन शाहीर, सचिव भारत भोंग तसेच मोठ्या प्रमाणात युवक कारकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

येणार्‍या काळात ओबिसीच्या योजना आणी आरक्षण लढ्यात होत असणारी समाजाची पिळवणूक थांबविण्यासाठी प्रयत्न करणार
असल्याचे अभिजीत काळे यांनी जाहीर केले.

ओबिसी सेवा संघाचे काम पाच राज्यात चालु असुन येणार्‍या काळात महाराष्ट्रात संघटना मजबुतीकरण सुरु असुन सुप्रीम कोर्ट आणि राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी ओबीसींचे फरपट थांबविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत प्रदेश अध्यक्ष किशोर मासाळ व्यक्त केले.

बारामती येथील बारामती क्लब या ठिकाणी ओबीसी सेवा संघाची महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळेस सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष पद अभिजीत काळे यांना देण्याचे एकमताने ठरविण्यात आले.

भारतात 4 हजार पेक्षा जास्त ओबीसी जाती आहेत. महाराष्ट्र 270 आहेत. या सर्व जातींना घेऊन ही संघटना काम करते. ही संघटना ओबीसीमधील सर्वच जाती धर्मासाठी काम करणारी आहे. शिक्षण, रोजगार, राजकीय, उद्योग या क्षेत्रात ओबीसी समाजातील लोकांना युवकाना सवलती मिळण्याचा मुख्य उद्देश या संघटनेचा आहे. ही संघटना मजबुत करण्यासाठी व संघटनेतून जास्तीत जास्त ओबीसीं कुटुंबाना ओबीसीं सवलतीचा फायदा देण्याचे काम करनार आहे. येणार्‍या काळात या संघटनेच्या माध्यमातून ओबीसी क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. सद्यस्थितीला ओबीसी विना निवडणूक घ्या हा निवडणूक आयोग व मे.हायकोर्टाने जो चुकीचा निर्णय घेतला त्यास संघटनेचा पूर्ण विरोध आहे. 52% जनता ही ओबीसी आहे त्यांना विचारात न घेता निवडणूका होऊन देणार नाही. वेळ पडली तर संघटनेतर्फे मुंबई व दिल्लीत सुद्धा महाराष्ट्रातील 270 पेक्षा जास्त जातींना बरोबर घेऊन मोर्चा काढला जाईल असाही इशारा यावेळी देण्यात आला आहे.
सामाजिक कार्य चा व युवका मधील क्रेज तसेच युवकाची ऐक मोठी संख्या आसल्या मुळे संधी मिळाली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!