अशोक घोडके यांजकडून…
गोतंडी (वार्ताहर): पुणे येथील बहुजन समाज पार्टीच्या कार्यालयात बहन कुमारी मायावतीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदेश सचिवपदी अजित ठोकळे यांची फेरनिवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीपजी ताजणे यांनी अजित गुलाब ठोकळे यांना निवडीचे पत्र प्रदान केले.
यावेळी प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड, जिल्हाध्यक्ष हुलगेशभाई चलवादी, प्रदेश सचिव भाऊ शिंदे व पुणे जिल्ह्यातील इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ठोकळे यांनी महाराष्ट्र मध्ये येणार्या आगामी काळामध्ये बहुजन समाज पार्टीच्या विचाराचे असंख्य कॅडर कार्यकर्ते तयार करण्यात येणार असून आगामी लोकसभा, विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्षाचे उमेदवार मोठ्या ताकतीने उभा करण्यात येतील. महाराष्ट्रातील आघाडी सरकार व केंद्रातील बीजेपी सरकार जनतेची फसवणूक करत असून महागाई बेरोजगारी ने जनता त्रस्त झालेली आहे. ओबीसी आरक्षण आणि दलितावर होणारे अन्याय अत्याचार याबाबत समाजामध्ये जागृती करणार असल्याचे यावेळी पदभार स्विकारताना बोलत होते.