बारामती(वार्ताहर): सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या सौ.कल्पना काटकर यांची शिवसेना बारामती तालुका महिला संघटकपदी नियुक्त केल्याची माहिती शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.
मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्यातील शिवसेना महिला पदाधिकार्यांच्या प्रभारी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. बारामतीतून कल्पना काटकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेऊन नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नियुक्ती कायम करण्यात आली आहे. कल्पना काटकर यांनी कोरोना काळात विविध रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रक्तपुरवठा, प्लाझ्मा इ. उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. शिवसेना पक्षात विविध कार्यक्रम, रक्तदान शिबीरे, महिलांचे संघटन या सर्व बाबींचा विचार करून त्यांना तालुका महिला संघटकपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.