अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): येथील किंगफायटर जुदो कराटे प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांची हिमाचल प्रदेश येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांचे कौतुक करून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलया. श्री.गारटकर यांच्या शुभहस्ते यश प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब व्यवहारे, माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले, नागेश व्यवहारे, पप्पू पवार इ.उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन किरण राऊत यांनी केले.