अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): महिलांच्या कर्तृत्वामुळे देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत महिलांनी झेप घेऊन आपला ठसा उमटविला असल्याचे प्रतिपादन प्रा.जयंत नायकुडे यांनी व्यक्त केले.
मराठी पत्रकार परिषद संलग्न इंदापूर मराठी पत्रकार संघ व जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूर यांचे संयुक्त विद्यमाने इंदापूर शहरातील दत्तनगर येथे राजमाता जिजाऊ यांची 424 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा.नायकुडे बोलत होते.
या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष कृष्णाजी ताटे, भाजप ओबीसी मोर्चा इंदापूर तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे, न.प.कॉंग्रेस गटनेता कैलास कदम, नगरसेवक अनिकेत वाघ, भाजप शहराध्यक्ष शकिल सय्यद, राष्ट्रवादी महिला आघाडी शहराध्यक्षा उमाताई इंगोले, डॉ.ओंकार ताटे, प्रकाश आरडे, अशोक घोडके दत्तात्रय मिसाळ इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.नायकुडे म्हणाले की, धावत्या युगात केवळ चुल आणि मुल या पुरतेच महिलांचे क्षेत्र सिमीत न राहता शिक्षणाच्या जोरावर पुरूषांच्या खांद्याला खांदा लावुन काम करणार्या कर्तुत्ववान महिलांनी देशात सर्वच स्तरावर आघाडी घेतली आहे. भविष्यात कर्तुत्ववान महिला समाजाला प्रगतीपथावर आणण्याचे काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी विविध सामाजिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्तत्ववान जिजाऊंच्या लेकीं पत्रकार धनश्री गवळी, उमाताई इंगोले, उज्वलाताई चौगुले, करिष्मा शहा, स्मिताताई पवार, महिला जयश्रीताई खबाले, अनिताताई खरात, सविता मोहिते यांचेसह जय इंन्टिट्युटचे अध्यक्ष जयंत नायकुडे व त्यांच्या पत्नी लताताई नायकडे, ह.भ.प.आबासाहेब उगले यांचाही सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार सुधाकर बोराटे यांनी केले तर सूत्रसंचालन आकांक्षा दाभाडे यांनी केले.