ज्येष्ठ नागरिक शकुंतला गारटकर यांच्या निधनाने आदर्शवत व्यक्तिमत्व हरपले- हर्षवर्धन पाटील

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): इंदापूर येथील ज्येष्ठ नागरिक शकुंतला बजाजी गारटकर वय 94 यांच्या निधनामुळे गारटकर कुटुंबावर शोककळा पसरली असून शकुंतला गारटकर यांच्या निधनाने आदर्शवत व्यक्तिमत्व हरपले आहे. या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती देवो असे राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांत्वन भेटीच्या वेळी मत व्यक्त केले.

श्री.नारायणदास रामदास प्रशालेचे माजी मुख्याध्यापक अरविंद गारटकर यांच्या मातोश्री शकुंतला बजाजी गारटकर यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज या कुटुंबाला भेट देत त्यांचे सांत्वन केले.

या भेटीच्या वेळी नगरसेवक भरत शहा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक अविनाश कोथमिरे, डॉ. संजय हेगडे, माजी मुख्याध्यापक अरविंद गारटकर, जयवंत गारटकर, प्रसाद गारटकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!