बारामती (उमाका): राजमाता जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनानिमित्त तहसिल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी राजमाता जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार विलास करे, महादेव भोसले, भक्ती देवकाते-सरवदे तसेच तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.