सुदाम मोरे यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन

बारामती(वार्ताहर): कर्‍हावागज (ता.बारामती) येथील सुदाम बंडा मोरे यांचे वयाच्या 81 व्या वर्षी वृद्धापकाळाने 30 डिसेंबर 2021 रोजी शिर्सुफळ आजोळ याठिकाणी दु:खद निधन झाले.

मोरे हे उत्तम ढोलकी व तबला वादक होते. गायनपार्टी व भजनी मंडळामध्ये त्यांनी काम केले. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. त्यांच्या जाण्याने कर्‍हावागज व शिर्सुफळ येथे शोककळा पसरली होती.

त्याचे पश्र्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अशोक व विजय हे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सेवेत कार्यरत असुन राजु हे भारतीय बौद्ध महासभा शाखा बारामतीचे बौद्धाचार्य व समता सैनिकदल संरक्षण विभाग तालुका उपाध्यक्ष म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्र्वराजवळ प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!