बारामती(वार्ताहर): वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे कार्याध्यक्ष अमिन हंबीर शेख यांच्यावतीने बारामती शहर पोलीस स्टेशनला मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक, उपनिरीक्षक श्री.पालवे उपस्थित होते.
लॉकडाऊन काळात पोलीसांनी जनतेसाठी केलेले कार्य सर्वांनी पाहिले. अदृश्य शत्रूशी दोन हात करून त्यांनी लढा दिला तर काहींना आपले प्राण गमवावे लागले. ओमिक्रॉन सारख्या अदृश्य शत्रूने पुन्हा शिरकाव केला आहे. त्यापासून पोलीसांना सुरक्षा मिळावी म्हणून मास्कचे वाटप करण्यात आले.