बारामती(वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे स्वीय सहाय्य हनुमंत पाटील यांचा बारामतीत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शरीरसौष्ठव पट्टू संतोष जगताप व मित्र परिवारातर्फे केक कापून श्री.पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. श्री.पाटील यांचा बारामतीकरांशी असलेला संपर्क, समन्वय व संवाद पाहता त्यांचा असंख्य असा मित्र परिवार निर्माण झालेला आहे.