बारामती(वार्ताहर): जावेद हबीब हेअर अँड ब्युटी लि.चे मालक केश रचनाकार जावेद हबीब यांचा बारामती तालुका नाभिक संघटनेच्यावतीने बारामती शहर पोलीस स्टेशनला 8 जानेवारी रोजी लेखी निवेदन देवून जाहिर निषेध करण्यात आला.
उत्तर प्रदेश मुजफ्फरनगर मध्ये सेमिनार सुरू असताना प्रात्यक्षिक दाखवताना जावेद हबीब यांनी एका महिलेवर हेअर स्टाईलचा डेमो दाखवत असताना, शोमध्ये सर्वांसमोर त्या महिलेच्या केसांमध्ये चक्क थुंकतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हे कृत्य खूप आपमानास्पद व लाजीरवाणा प्रकार आहे.
प्रत्येक व्यावसायिक ग्राहक देवं भवं म्हणून मानतो. मात्र जावेद हबीब यांनी हे कृत्य करून महिलांचा विशेष सलून व्यवसायाचाही अपमान केला आहे. त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी ऍड.सौरभ कुंभार यांनी मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष.पै सुधाकर माने, माजी अध्यक्ष नवनाथ आपुणे, उपाध्यक्ष सुदाम कडणे, खजिनदार गणेश चौधरी, सचिव किरण कर्वे, सहसचिव किसान भाग्यवंत, संस्थेचे चेअरमन महेश वारुळे, श्रीपाल राऊत, अनिल जाधव, किशोर माने, सागर माने, अमोल राऊत, आदेश आपुणे, अजित यादव (महाराज), रोहन शिंदे,रणधीर गाडेकर हे समाज बांधव उपस्थित होते.
जावेद हबीबच्या या गैरवर्तणूकीमुळे देशभरातील सर्व सलून व्यवसायकांची मने दुखावली आहेत. त्यामुळे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी असेही आवाहन करण्यात आले आहे.