बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला . यात बारामतीच्या कै.ग.भि.देशपांडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे .शहरी विभागातून बारामती तालुक्यातील पाचवी शिष्यवृत्ती प्राप्त ठरलेल्या सोळा विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थी तर, आठवी शिष्यवृत्ती प्राप्त ठरलेल्या नऊ विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थी हे याच विद्यालयाचे आहेत. शहरी विभागातून सर्वाधिक शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी याच विद्यालयाचे आहेत.
बारामती तालुका शहरी विभागातून पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत कु.सृष्टी लोणकर 300 पैकी 258 तर, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत चि.निशांत बेदमुथा 300 पैकी 252 गुण प्राप्त करून तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे .या सर्व विद्यार्थ्यांना राज्य शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या वतीने नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्रबुद्धे, विद्यालयाच्या शाळा समितीचे अध्यक्ष धनंजय खुर्जेकर, विद्यालयाचे महामात्र गोविंद कुलकर्णी, शाळा समन्वयक पुरूषोत्तम कुलकर्णी, सल्लागार समिती सदस्य राजीवजी देशपांडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेद सय्यद सर व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.