करंजे (वार्ताहर): पत्रकारांनी कान व डोळ्यांनी केलेले काम लेखनीतून उतरले तर समाजाचे प्रश्र्न मार्गी लागतात असे प्रतिपाद ज्येष्ठ पत्रकार जयराम सुपेकर यांनी केले.
पत्रकार दिनी भारतीय पत्रकार संघाच्या बारामती तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी श्री.सुपेकर बोलत होते.

यावेळी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष तैनुर शेख, बारामती तालुका अध्यक्ष काशिनाथ पिंगळे, प्रणाली ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बुवासाहेब हुंबरे, करंजे येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रताप गायकवाड इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सुपेकर म्हणाले की, वृत्तपत्रात नेमकं काय लिहिलेले आहे हे जाणण्याची इच्छा प्रत्येकाला असते आजही त्याला विशेष महत्व आहे. समाजाचा आरसा म्हणून पत्रकारांनी काम केले पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी सोमनाथ लांडेसाहेब, तैनुर शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरूवातीस उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष काशिनाथ पिंगळे, सूत्रसंचालन विनोद गोलांडे यांनी तर आभार शरद भगत यांनी मानले.