गैरमार्गाने कमविलेली मालमत्ता जप्त होणार का?
बारामती(वार्ताहर): येथील गुलपूनावाला बागेसमोरील हिरा पान दुकानात बेकायदेशीर हजारो रूपयांचा गुटखा विक्री करणार्या हिरालाल हसन बागवान याच्यावर बारामती शहर पोलीस स्टेशनला भा.दं.वि.संहिता कलम 328, 272 तसेच अन्न सुरक्षा अधिनियम आचे विविध कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या बेकायदेशीर व्यवसायातून कमविलेली मालमत्ता जप्त होणार का? असा सर्वसामान्य नागरीकांना पडलेला प्रश्र्न आहे.
सदरच्या दुकानात पोलीसांनी दोन पंचांसमक्ष टाकलेल्या छाप्यामध्ये गुलाम, विमल, चौकीदार, आर.एम.डी, जाफरानी, व्ही-1, गोवा 1000,पान पराग एक्स्ट्रा, पान मसाला विविध ब्रँडचे साठ रुपये पुडा ते 400 रुपये पुडा एमआरपी असलेले विविध ब्रँडचे एकूण 402 पुडे त्या ठिकाणी विक्री करताना मिळून आला याठिकाणी घेण्यासाठी आलेले दोन ग्राहक पळून गेले सदर जप्त केलेल्या गुटका व तंबाखू व पान मसाल्याची एकूण बाजारातील एमआरपी किंमत 52 हजार रुपये आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, पो.ह.अभिजीत कांबळे, पो.ना. दशरथ कोळेकर, पो.ना. कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण श्री.राऊत यांनी केली आहे.
एखाद्या मुस्लिम समाजातील महिलेने बुरखा परिधान करून गैरकृत्य केल्यास त्या महिलेला व तिच्या कुटुंबियांना हीन लेखण्याचे व अपमानीत करून खडे बोल सुनावण्याचे काम केले जाते. काही वर्षापुर्वी पुण्यात 31 डिसेंबरला ड्रग्स विक्री करणारी शायनी नावाची महिलेने बुरखा परिधान करून गैरकृत्य केले त्यावर समाजातील लोकांनी सोशल मिडीयावर निषेध व्यक्त केला होता. मात्र, आज हिरालाल याने टोपी परिधान करून अवैधरीत्या गुटखा विक्री केली त्यामध्ये त्याच्यावर कारवाई झाली आज यावर कोणीही अपशब्द बोलणार नसतील तर हीच का इस्लामची शिकवण असे म्हणावे लागेल.
हिरालाल.. प्लॉटमध्ये मालामाल
बारामती देसाई इस्टेट येथे हिरालालच्या नावावर कोट्यावधी रूपयांचे प्लॉटस् आहेत हे सर्व प्लॉट अवैध धंद्यातून कमाविलेले असल्याच बोलले जात आहे त्यामुळे हे सर्व प्लॉट शासनाने जमा करावे अशी मागणी येथील स्थानिक नागरीकांमधून होत आहे.