पश्र्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेने डोळ्याचे पारणे फेडले
बारामती(वार्ताहर): पश्र्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी साहेब चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील खुल्या गटात देसाई युनायटेड, पिंपरी-चिंचवड हा संघ मानकरी ठरला तर एक गाव एक संघ गटाचा केबीके भिगवण संघ मानकरी ठरला.
अंतिम सामना भागवत बापू चौधर, निर्मिती ग्रुप, बारामती विरुद्ध देसाई युनायटेड यांच्या दरम्यान झाला. एक गाव एक संघ गटातील सामना भिगवण विरुद्ध नातेपुते यांच्या दरम्यान झाला.
या स्पर्धेत एक गाव एक संघ व खुल्या तालुकास्तरीय असा डबल धमाक्याचा आनंद बारामतीकरांनी लुटला. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील 80 संघांनी सहभाग दर्शविला होता. अनेक नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची बारामतीकरांनी एकच गर्दी केली होती. ज्या पध्दतीने बारामतीकर क्रिकेट रसिकांनी या स्पर्धेला प्रतिसाद दिला त्याचेही कौतुक सर्वच सहभागी संघातील खेळाडूंना केले व या ठिकाणी आम्हाला खेळायला येण्यास नेहमीच आवडते व भविष्यातही येत राहू हा विश्वास व्यक्त केला.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राकेशभैय्या वाल्मिकी यांच्यासह सोनूभैय्या कांबळे, पोपट उगाडे, मोईन बागवान यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच सत्यजित देवकते, महंमद शेख, सागर आल्हाट, गणेश शिंदे, सनी साळुंखे, राहुल उघाडे, अक्षय कांबळे, संतोष उघाडे, मुबून बागवान, सुमित मोहिते, यश बागडे, सुशांत सोनवणे, नासीर अन्सारी, अमोल घाडगे सर, केतन जाधव, जमीर शेख इतर सर्व भैय्यांवर प्रेम करणार्या मित्र परिवाराच्या साथीने साहेब चषक पर्व चार यशस्वी रीतीने पार पडले.
तालुका खुल्या गटातील स्पर्धेचा मालिकावीर 148 धावा करणारा पुण्याचा विपुल खैरे ठरला. यास जगननाथ (तात्या) चिंचकर यांच्या वतीने बक्षीस देण्यात आले.
निर्मिती ग्रुपचा आकाश तारेकर 113 धावांच्या खेळीमूळे उत्कृष्ट फलंदाज तर पुणे संघाचा रोहन खरात 9 बळी घेत उत्कृष्ट गोलंदाज ठरला.
एक गाव एक संघ स्पर्धेत भिगवणचा शफीक शेख मालिकावीर ठरला. तसेच बारामतीचा निलेश धवडे उत्कृष्ट फलंदाज तर नातेपुते संघाचा अमीर काझी उत्कृष्ट गोलंदाज ठरला.
अंतिम दिवशी सेमी फायनलच्या दोन अटीतटीच्या लढती झाल्या ज्यामध्ये पहिली लढत देसाई युनायटेड विरुद्ध एस. जे. टायगर्स, आंबेगाव यांच्यामध्ये झाली तर दुसरी लढत सुपर स्ट्रायकर्स विरुद्ध भागवत बापू चौधर,निर्मिती ग्रुप यांच्यादरम्यान झाली. तर पोलिस विरुद्ध पत्रकार हा प्रेक्षणीय सामना झाला. पोलीस 11 संघातून उपविभागीय अधिकारी बारामती गणेश इंगळे, बारामती शहरचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, शेंडगे, चव्हाण, कोठे, पवार, निंबाळकर तसेच पत्रकार 11 संघातून अभिजित कांबळे, तानाजी पाथरकर, योगेश नालंदे, साधू बल्लाळ, हेमंत गडकरी, तैनुर शेख आदी मान्यवरांनी क्रिकेट चा आनंद घेतला. या अटीतटीच्या लढतीत पोलीस 11 संघाचा विजयी झाला. या स्पर्धेचे समालोचन ज्ञानेश्वर मामा जगताप, सलीम शेख, इर्षाद बागवान यांनी केले. सदर स्पर्धा यशस्वी झाल्याने राकेश वाल्मिकी व मित्र परिवारांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या चार वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात ही स्पर्धा प्रसिद्ध पावलेली आहे.
खुल्या तालुकास्तरीय स्पर्धा :-
*प्रथम पारितोषिक 1 लाख 51 हजार व चषक सौजन्य- नगरसेवक सत्यव्रत काळे, नटराज मटन शॉपचे अफरोज कुरेशी व ईझी मोबाईल शॉपीचे अदिल पटेल यांच्या तर्फे विभागून दिले आहे. *द्वितीय 71 हजार व चषक ग्रामपंचायत बळपुडी (ता.इंदापूर) चे सरपंच विजय चोरमले, *तृतीय 41 हजार सावळ ग्रामपंचायतीचे सदस्य चेतन आटोळे तर *चतुर्थ 31 हजार युवा नेते संतोषआण्णा सातव यांनी दिले.*इतर बक्षिसांमध्ये बेस्ट बॅट्समन 5 हजार 100, मॅन ऑफ द सिरीजचे बक्षिस जगन्नाथ तात्या चिंचकर यांच्यातर्फे 11 हजार तर बेस्ट बॉलर 5 हजार 100 रूपये देण्यात येणार आहे.
एक गाव एक संघ स्पर्धा :-
* प्रथम पारितोषिक 51 हजार सौजन्य- उद्योजक सतिश माने, *द्वितीय 31 हजार युवा नेते मंगेश ओंबासे, *तृतीय 11 हजार प्रतिक ढवाण, *चतुर्थ उद्योजक सनी काशिद यांच्यातर्फे 11 हजार * इतर बक्षिसांमध्ये बेस्ट बॅट्समन 2 हजार 100, मॅन ऑफ द सिरीज 5 हजार 100 तर बेस्ट बॉलर 2 हजार 100 रूपये देण्यात येणार आहे.