पवार कुटुंबियांचा विश्र्वास कमविणारे, किरणदादा….

ङ्कदादाङ्ख म्हटलं की, आपुलकी, हक्काचा व हृदयस्पर्शी शब्द वाटतो. काही शब्द असे असतात की, त्याचा उच्चार केला तर तो व्यवहाररूपी असतो. बारामतीच्या विकासातील महत्वाचा घटक म्हणून ज्यांच्याकडे आपुलकी व हक्काने पाहिले जाते असे बारामती नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर आहेत. त्यांच्या 12 जानेवारी वाढदिवसानिमित्त थोडसं…

किरणदादा सन 1985 ते आजपावेतो गेली 8 टर्म बारामती नगरपरिषदेचा चोख कारभार सांभाळीत आहेत. या कामातून त्यांनी खा.शरदचंद्रजी पवार साहेब, ना.अजितदादा पवार व खा.सुप्रियाताई सुळे याच्यासह इतर पवार कुटुंबियांतील व्यक्तींचा विश्र्वास कमविलेला आहे. ना.अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करीत आहेत. ना.अजित पवारांचे अत्यंत जवळचे निकटवर्ती म्हणून त्यांची आगळी वेगळी ओळख आहे. योग्य व अचूक बोलून काम मार्गी लावणारे किरणदादा आहेत.

अजितदादांचा आदेश म्हणजे त्यांच्यासाठी जीव की प्राण असतो ते त्या आदेशाप्रमाणे त्या आदेशाला अधिन राहून काम करीत आलेले आहेत. किरणदादांनी आजपर्यंत जे काम केले ते फक्त आणि फक्त पवार कुटुंबियांसाठी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी केले. आजही यामध्ये त्यांचा कोणताही स्वार्थ नाही. जर स्वार्थ असता तर त्यांनी स्वत:चा, कुटुंबियांचा व पै-पाहुण्यांचा विविध व्यवसाय उभारून त्यामधून विकास केला असता व स्वार्थ साधुन झाल्यावर हळूच काढता पाय केला असता. परंतु, तसे न करता त्यांनी अखंडपणे, एकनिष्ठेने व विश्र्वासाने पवार कुटुंबियांची सेवा केली हे कोणी जोतिष्याने सांगण्याची गरज नाही.

या एकनिष्ठता व विश्र्वासामुळे पवार साहेबांनी विद्या प्रतिष्ठान सारख्या शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्थेवर विश्र्वस्त म्हणून नियुक्ती केली हीच खुप मोठी कामाची व विश्र्वासाची पावती त्यांना मिळाली.

दि.10 जानेवारी 2022 रोजी मराठी विभागाचे माजी प्राध्यापक डी.एस.शहा त्यांच्या पत्नीबरोबर भिगवण रोडने फिरत असताना किरणदादांना नजरेस पडले. त्यांनी तातडीने दुचाकी बाजुला घेऊन आदराने नमस्कार केला. हात बांधून मान खाली घालून एकाग्रतेने त्यांचे सांगणे ऐकत होते. गुरूचा आदर काय व कसा करायचा हे किरणदादांकडून शिकावे तेवढे कमी आहे. एवढा काळ लोटला मात्र गुरूबद्दल असणारे प्रेम, आदर करणारे दृष्य मला पहावयास मिळाले याचे मी भाग्य समजतो.

अशा महान गुरूंनी दिलेले ज्ञान किरणदादांनी खरं प्रत्यक्षात उतरवले आणि यश, प्रगती, किर्तीसह लोक कल्याणासाठी झटून ते शिष्याचा धर्म समाजात पाळत आहेत हे वाखण्याजोगे आहे.

किरणदादांनी सभ्य राजकारणातून विरोधकांना सुद्धा जिंकले आहे. त्यांनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही. त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विरोधक सुद्धा येतात ही खूप मोठी बाब आहे. कोण त्रास देत असेल तर त्याला कधी शिव्याशाप देत बसले नाही. राजकारणातील नैतिकता व निस्पृहपणा जपली. आज पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या कामावर नाराज असतील मात्र, ते जे काम करतात ते फक्त आणि फक्त ना.अजितदादांच्या आदेशानेच त्यामुळे स्वकीय व परकीय नाराज झाले तरी त्यांना काहीएक देणं घेणं नाही.
काही अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली मंडळी विरोधकांना हाताशी धरून किरणदादांच्या कामात अडथळा निर्माण करतात तरीही किरणदादा त्या लोकांचे स्वागत करून न्यायिक लढाई लढून त्यांना त्यांची चूक दाखवून देतात. कारण लोकं आंब्याच्या झाडाला सोडून इतर झाडांना दगडी मारीत नाहीत.

ज्यांना ज्यांना त्यांचा सहवास लाभला त्यांना ज्ञानाचा भांडार मिळाला आहे. त्यांच्या बरोबर काम करणार्‍यांचे त्यांनी सतत हित पाहिले आहे. योग्य मार्गदर्शन केले आहे. असा एकमेकांचा विश्र्वास कमविणारे सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात फार कमी आहेत.

तैनुर शफिर शेख
संपादक, सा.वतन की लकीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!