राधेश्याम एन.आगरवाल टेक्निकलचे विद्यार्थी झाले लसवंत

बारामती(वार्ताहर): रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनइर कॉलेज मध्ये मोठ्या उत्साहात 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सुरू झाले. पुणे जिल्ह्यात सोमवारपासून 15 ते 18 वर्ष वयोगटा तील मुला-मुलींच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या लसीकरण साठी केंद्र सरकारने 3 जानेवारी पासून सुरू करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. मुलांच्या लसीकरणासाठी पुणे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.नाझीरकर यांनी विद्यार्थी व पालक यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा व या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.उपस्थित डॉ.व आरोग्य कर्मचारी यांचे स्वागत विद्यालयाचे प्रा.श्री झाकीर शेख यांनी केले तर सूत्रसंचालन श्री सुदाम गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!