बारामती(उमाका): क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती प्रशासनातर्फे तहसिल कार्यालयात साजरी करण्यात आली. प्रारंभी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार विलास करे, पी.डी.शिंदे यांच्यासह आणि उपविभागीय अधिकारी, तहसिल कार्यालयातील कर्मचार्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.