बारामती(वार्ताहर): लोकांच्या कल्याणासाठी बँकेत सक्षम काम करा असा सल्ला नवनिर्वाचित संचालकांना आय.एस.एम.टी.चे किशोर भापकर यांनी दिला.
सहारा फौंडेशनच्या वतीने बारामती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी सचिन सातव, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी संभाजी होळकर, मुस्लिम को-ऑप बँकेच्या संचालकपदी आलताफ सय्यद व बारामती बँकेच्या संचालकपदी गिरीष कुलकर्णी यांची निवड झालेबद्दल सत्कार समारंभ कार्यक्रमात श्री.भापकर बोलत होते.
या कार्यक्रमासाठी योगेश चिंचकर, भानूदास बाप्पू हिंगणे, बाळासाहेब चव्हाण पाटील, राजेंद्र सोळस्कर, दिलीप ढवाण पाटील, हाजी कमरुद्दीन सय्यद, आदित्य हिंगणे इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना भापकर म्हणाले की, महालक्ष्मी उद्योग समुह सचिन सातव उत्कृष्ठपणे चालवितात ते बँक नक्की चालवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन सातव यांना ऍड.शिरीष कुलकर्णी सारखे बुद्धीवान लोकांची साथ आहे त्यामुळे सभासदांच्या हिताचे निर्णय होतील यात शंका नाही. सहकारात सोपं राहिले नाही. पुढील निर्णय घेताना आपण व बँक अडचणीत येणार नाही याचा काम करताना विचार करा. अजितदादां सारखे काम करा, कोणीही आला तरी त्याचे काम मार्गी लावा.
मुस्लिम बँकेची प्रतिमा काही प्रमाणात ढासळली आहे ती प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न आलताफ व बँकेच्या पदाधिकार्यांनी करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार सहारा फौंडेशनचे अध्यक्ष परवेज सय्यद यांनी मानले.
यावेळी विपुल ढवाण पाटील, अनिल कदम, तैनुर शेख सलीम तांबोळी, आसिफ झारी, मुनीर तांबोळी, सुधीर वाघमारे, आनंद उदावंत, अमित शिवरकर, हाजी रशीद बागवान, सादिक मोमीन,अकलाज सय्यद, इक्बाल सय्यद, तुषार लोखंडे, चंद्रकांत लोंढे, महेश गायकवाड, संदेश गावडे पाटील, योगेश ढवाण पाटील, प्रवीण पवार, राहुल झगडे, जहीर पठाण सहकारी मित्र व सहा फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.