80 संघांचा सहभाग : खुल्या तालुकास्तरीय व एक गाव एक संघ असा क्रिकेटचा डबल धमाका
बारामती(वार्ताहर): पश्र्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी राकेश(भैय्या) वाल्मिकी युवा मंच, आमराई बारामती खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त साहेब चषकाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.31 डिसेंबर रोजी बारामती नगरपरिषदेचे जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, बारामती नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सत्यव्रत काळे, नगरसेवक राजेंद्र बनकर, नवनाथ बल्लाळ, सुधीर पानसरे, सौ.अनिता जगताप, सौ.मयुरी शिंदे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष नितीन मोहिते, अभिनव दहिहंडी संघाचे आधारस्तंभ सचिन मोरे, गोजुबावी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश आटोळे, रणजीत जमदाडे, ऍड.धीरज लालबिगे, आदिल पटेल, संतोष सातव, उद्योजग पिंटू गायकवाड, निलेश मोरे, सनी चव्हाण, विठ्ठलराव गाढवे, कुंडलिक जगताप, अमोल लेंढे, उत्तम धोत्रे, इम्रान पठाण, रमेश गिरमे, गौतम शिंदे, राहुल मदने, उद्योजक सुग्रीव निंबाळकर, पै.गणेश काशिद, जगन्नाथ चिंचकर, प्रतिक ढवाण, सनी काशिद, पत्रकार तानाजी पाथरकर, योगेश नालंदे, तैनुर शेख इ. मान्यवर उपस्थित होते.
किरण गुजर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, निकोपपणे स्पर्धा होतील. तरूणांना चांगल्या पद्धतीचे खेळ पहायला मिळेल. साहेब चषक ज्या संघाला प्राप्त होईल त्यास साहेबांचा आशिर्वाद मिळाल्यासारखे होईल. यावेळी इम्तियाज शिकीलकर यांनी शुभेच्छा दिल्या.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मैदानाचे पूजन करून कटफळ विरूद्ध पणदरे सामन्याचे नाणेफेक करण्यात आला.
दि.5 जानेवारी 2022 पासून नामांकित संघांच्या तालुकास्तरीय स्पर्धा सुरू करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांचे हस्ते करण्यात आले. बारामतीकरांना महाराष्ट्रातील अनेक दिग्गज संघ आणि अनेक नामांकित खेळाडू खेळताना दिसणार असल्याचे राकेश(भैय्या) वाल्मिकी युवा मंचचे राकेश वाल्मिकी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्र्वरमामा जगताप यांनी केले.
यावेळी राकेश(भैय्या) वाल्मिकी युवा मंचचे सोनू कांबळे, पोपट उघाडे, मोईन बागवान, सत्यजीत देवकाते, सागर अल्हाट, मोबीन बागवान, राहुल उघाडे, संतोष उघाडे, शंभू मोहिते, सुशांत सोनवणे, यश बगाडे, तुषार सोनवणे इ. अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
या स्पर्धांचे समालोचन ज्ञानेश्र्वरमामा जगताप, इरशाद बागवान (सांगोला), सलिम शेख (फलटण) हे करीत आहेत.
खुल्या तालुकास्तरीय स्पर्धा :-
*प्रथम पारितोषिक 1 लाख 51 हजार व चषक सौजन्य- नगरसेवक सत्यव्रत काळे, नटराज मटन शॉपचे अफरोज कुरेशी व ईझी मोबाईल शॉपीचे अदिल पटेल यांच्या तर्फे विभागून दिले आहे. *द्वितीय 71 हजार व चषक ग्रामपंचायत बळपुडी (ता.इंदापूर) चे सरपंच विजय चोरमले, *तृतीय 41 हजार सावळ ग्रामपंचायतीचे सदस्य चेतन आटोळे तर *चतुर्थ 31 हजार युवा नेते संतोषआण्णा सातव यांनी दिले.*इतर बक्षिसांमध्ये बेस्ट बॅट्समन 5 हजार 100, मॅन ऑफ द सिरीजचे बक्षिस जगन्नाथ तात्या चिंचकर यांच्यातर्फे 11 हजार तर बेस्ट बॉलर 5 हजार 100 रूपये देण्यात येणार आहे.
एक गाव एक संघ स्पर्धा :-प्रथम पारितोषिक 51 हजार सौजन्य- उद्योजक सतिश माने, *द्वितीय 31 हजार युवा नेते मंगेश ओंबासे, *तृतीय 11 हजार प्रतिक ढवाण, *चतुर्थ उद्योजक सनी काशिद यांच्यातर्फे 11 हजार * इतर बक्षिसांमध्ये बेस्ट बॅट्समन 2 हजार 100, मॅन ऑफ द सिरीज 5 हजार 100 तर बेस्ट बॉलर 2 हजार 100 रूपये देण्यात येणार आहे.