बारामती(वार्ताहर): मायेची ऊबदार रग काळे कुटुंबियांचे प्रेम देवून जाईल असे प्रतिपादन बारामती नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी केले.
कै.अर्जुनराव बाजीराव काळे (बाबा) यांच्या स्मरणार्थ गोर-गरीब व गरजुंना एक हजार ब्लँकेटचे वाटप कार्यक्रम प्रसंगी श्री.गुजर बोलत होते. यावेळी फकरूद्दीन भोरी, बा.न.प.चे बांधकाम सभापती सत्यव्रत काळे, नगरसेवक राजेंद्र बनकर, अमर धुमाळ, माजी नगरसेवक पांडूरंग आटोळे, विजय खरात, अभिजीत चव्हाण, बन्सीलाल मुथा, आयर्नमॅन सतिश ननवरे, विशाल जाधव, आदित्य हिंगणे, शुभम ठोंबरे, डॉ.गोकुळ काळे, सुनिल काळे, डॉ.रणजीत मोहिते, डॉ.अमित कोकरे, दत्तात्रय काळे, धैर्यशील काळे इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री.गुजर म्हणाले की, डॉ.ऋतुराज काळे व सत्यव्रत काळे हे सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रम घेत असतात. समाजामध्ये काम करीत असताना आपण काय करतो, किती करतो यापेक्षा कसे करतो याला जास्त महत्व आहे. पवार साहेब, दादा व ताईंचा वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवीत असतात. काळे कुटुंबियांनी प्रत्येक वेळी पवार कुटुंबियांना खंबीर साथ दिली व देत आहेत. सभापती सत्यव्रत काळे अतिशय तळमळीने नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रभागासाठी मुद्दे मांडत होते त्याचे खुप विशेष वाटले. कारण नगरपरिषदेची मुदत या महिन्या अखेर संपणार आहे तरी देखील काम राहिले आहे का, शेवटच्या क्षणापर्यंत कसे पूर्ण करता येईल यासाठी सत्यव्रत काळे प्रशासनाची भांडत होते. त्यांना दिलेली जबाबदारी ते चोखपणे बजावित आहे याचा इतरांनी बोध घ्यावा असेही ते म्हणाले.
यावेळी सतिश ननवरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित गरजु महिला व पुरूषांना मान्यवरांच्या हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन अनिल रूपनवर यांनी केले तर शेवटी आभार डॉ.ऋतुराज काळे यांनी मानले.