अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): अठराव्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणार्या सावित्रीबाई फुले यांची जयंती ग्रामपंचायत गोतंडीमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सरपंच गुरुनाथ नलवडे, उपसरपंच परशुराम जाधव, लोणकर भाऊसाहेब, आप्पा पाटील, संजय बिबे, अनिल खराडे, हरी भाऊ खाडे, बापू पिसे, मारुती नाना नलवडे, विजय शेटे, माने साहेब, प्रकाश मोरे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गावचे सरपंच गुरूनाथ नलवडे बोलताना म्हणाले की, विधवांचे पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, महिलांना शोषणापासून मुक्त करणे तसेच बहुजन, मागासवर्गीय महिलांना शिक्षित करणे यासारखे महत्त्वाचे कार्य करत सावित्रीबाईंच्या जीवनातील प्रत्येक क्षण समाजातील महिला आणि मागासवर्गीयांच्या उत्कर्षास समर्पित होतो.