अशोक घोडके यांजकडून…
सरडेवाडी(वार्ताहर): ग्रामपंचायत सरडेवाडी सरपंच सिताराम जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंबरोबर खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी उपसरपंच हनुमंत जमदाडे, सतिश चित्राव, आप्पा माने, बळीराम जानकर,स्वप्निल दंडेल, मुख्याध्यापक सिद्धार्थ चव्हाण, मोहनलाल पवार, शफीक शेख, बोराटे मॅडम, चंदनशिवे मॅडम, शशिकांत शेंडे इ. मान्यवर उपस्थित होते. शालेय वस्तुंमध्ये बूट, सॉक्स वाटप करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ़ व्हायब्रंट पुणे व रोटरी क्लब ऑफ वरकुटे पोमोग्रेनेट व्हीलेज अध्यक्ष यांच्यावतीने सिताराम जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा सरडेवाडी येथे व्हर्च्युअल सायन्स् लॅब भेट देण्यात आले.