बारामती(वार्ताहर): पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने बारामती तालुक्यातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संपर्क सुरू आहे.
स्टार प्रचारक नितीन शेंडे, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, संचालक राजेंद्र गावडे पाटील, माजी सभापती संदीप बांदल, बाजार समितीचे चेअरमन वसंतराव गावडे, दत्ता आवळे, तालुका उपाध्यक्ष रामचंद्र मदने, गुनवडीचे सरपंच सतपाल गावडे, विजय गावडे इ. कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व जिल्हा बँक पक्षाच्या माध्यमातून झालेला विकास याबाबत मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम केले.
स्टारप्रचारक नितीन शेंडे आपल्या कला, कौशल्यातून मतदारांपर्यंत बँकेचा विकास पोहचविण्याचे काम करीत आहेत.