एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत शेतकर्‍यांचे प्रक्षेत्र प्रशिक्षण

बारामती(उमाका): बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर दौंड व पुरंदर तालुक्यातील शेतकर्‍यांना मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षणाकरिता पाठवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

कृषी विज्ञान केंद्र बारामती, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन माळेगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, नाशिक जिल्ह्यातील कळवण उपविभाग, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था व फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र तळेगाव दाभाडे आणि डाळिंब संशोधन केंद्र गणेशखिंड याठिकाणी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणामध्ये फळबाग, भाजीपाला, फुलशेती, तंत्रज्ञान तसेच फळबाग व्यवस्थापन, काटेकोर शेती व्यवस्थापन, कांदाचाळ, संरक्षण शेती, एकात्मिक कीड रोग,अन्नद्रव्य व्यवस्थापन, काढणी पश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र निर्यातक्षम उत्पादन करता मार्गदर्शन, कृषी पर्यटन या विषयावर प्रगतशील शेतकर्‍यांच्या प्रक्षेत्रावर भेटीसोबत विविध संशोधन संस्थाच्या भेटीचे देखील नियोजन करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणाकरीता कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. उपविभागातील चार तालुक्यातील शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्यकरीता संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे 24 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!