माळेगांव(वार्ताहर): शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित महाविद्यालय असून चालू शैक्षणिक वर्षांमध्ये पुणे जिल्हा ग्रामीण भागामधील सर्वाधीक प्लेसमेंट देणारे महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळालेला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नव-नवीन क्रियाशील उपक्रम राबवण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असते. याचाच परिपाक म्हणून महाविद्यालयातील 05 विद्यार्थ्यांची ऑटोमेशन क्षेत्रात अग्रेसर असणाऱया फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. मुकणे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या निवडीची प्रक्रिया टेक्निकल इंटरव्ह्यू व पर्सनल इंटरव्ह्यू या दोन स्तरांवर मूल्यांकन करून संपन्न झाली.या निवड प्रक्रियेत एकूण 05 विद्यार्थ्यां यशस्वी झाले.महाविद्यालयातील अभिजीत कांबळे , अभिजीत मांडे , प्रणील गायकवाड , आकाश मोहिते व सुयोग गायकवाड या विद्यार्थ्यांच्या निवडीमध्ये समावेश झाला. सर्व क्षेत्रात यशस्वी असणारे उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाचा लौकिक आहे.विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर आधारित कार्यशाळांचे तसेच विविध वेबिनार मालिकांचे महाविद्यालया मार्फत आयोजन करण्यात येत आहे.चालू शैक्षणिक वर्षांमध्ये आतापर्यंत 247 विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे व ही निवडीची प्रक्रिया अजूनही सुरूच असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. माधव राउळ यांनी दिली.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब तावरे , विश्वस्त श्री.वसंतराव तावरे , श्री.अनिल जगताप , श्री.महेंद्र तावरे , श्री.रामदास आटोळे , श्री.गणपत देवकाते , श्री.रवींद्र थोरात व सचिव श्री.प्रमोद शिंदे यांनी अभिनंदन केल.