बारामती(वार्ताहर): कोरोना विषाणूने मृत व्यक्तीची प्रतिष्ठा, त्याची संस्कृती, धार्मिक परंपरा आणि त्यांचे कुटुंबियांचा आदर राखला गेला पाहिजे या बाबींचा विचार करीत मुस्लीम समाजातील काही देहवेडे व्यक्तींनी कोरोना रूग्णाचे अंत्यविधी व दफनविधी करण्यासाठी पुढे आले आहेत.
यामध्ये महेबुबनाना, निसार सिकंदर बागवान, मुख्तार साधना, फिरोज सत्तार बागवान, फैय्याज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मकसूद बागवान, अखलाक बागवान, सोहेल बम्बई, मुबिन बागवान, सारिया शेख, अब्रार बागवान, सोहेल मजिद, तौसिफ बम्बई यांनी कोरोना मृत रूग्णांचा अंतिम क्रीयाक्रम करण्याचे पुण्य काम हाती घेतले आहे. विशेष म्हणजे निसार सिकंदर बागवान यांना रूग्णालय बाबतचा व नगरपरिषदेमधील कामाबाबत असणारा अनुभव पाहता त्यांचे खूप मोठे योगदान आहे.
या अभूतपूर्व स्थितीत रुग्णांची काळजी घेणारे रुग्णाच्या नातेवाईकांची भूमिकाही हे व्यक्ती निभावत आहेत. मृत व्यक्तीचे नातेवाईकही तेच बनतायत आणि अंत्यविधी करणारेही. कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडणार्यांच्या नातेवाईकांचे दु:ख कमी करण्याचा कोणताही दुसरा मार्ग नसल्याची खंत ही या मंडळींनी व्यक्त केली आहे. मात्र मृतदेहांना सुद्धा आमच्याकडून आदर मिळेल ही आशा ठेवून हे वरील व्यक्ती काम करीत आहेत. या व्यक्तींनी अशाप्रकारे विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करीत रहावे असेही बोलले जात आहे.