शारदानगर(वार्ताहर): ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ.जाधव परिमिता विनायक यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष 2020 मध्ये Science Technology Faculty अंतर्गत Environmental Science विषयातील Treatability Studies on the Chicken Feather Waste from Baramati (Maharashtra) Region using Keratinolytic Microbial Isolates. या विषयावरील संशोधांनासाठी Ph.D. या पदवीने गौरविण्यात आले आहे.डॉ.जाधव यांच्या यशासाठी ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सौ.सुनंदा पवार,मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, मनुष्यबळ विकास अधिकारी गार्गी दत्ता, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. जे.साठे, उपप्राचार्य प्रा.रा.बा. देशमुख व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी शुभेच्छा दिल्या.