बारामती(वार्ताहर): कोणत्याही क्षेत्रात काम करताना ध्येय, सातत्य, जिद्द व चिकाटी महत्वाची असल्याचे मत उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे स्वीय सहाय्य हनुमंत पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार व सौ.प्रतिभाकाकी यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळ व्यायामशाळेत आयोजित कार्यक्रम प्रसंगी श्री.पाटील बोलत होते.
यावेळी बा.न.प.चे मुख्याधिकारी महेश रोकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक नितीन शेंडे,जलतरणपट्टू सुभाष बर्गे, ट्रीपल आयर्नमॅन सतीश ननवरे, उद्योजक दीपक कुदळे, मंडळाचे माजी अध्यक्ष बापू जाधव, श्रीकांत जाधव, पत्रकार तैनुर शेख, अमित बगाडे, ऑक्सीजन जिमचे मालक प्रेम जाधव, नुकताच युवा आयर्न मॅन पुरस्कार प्राप्त केलेले अभिषेक सतिश ननवरे इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नितीन शेंडे, सतिश ननवरे, अभिषेक ननवरे, जिमचे प्रशिक्षक संतोष जगताप, तैनुर शेख, महेश रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी नुकताच आयर्नमॅन किताब पटकाविलेला अभिषेक ननवरे, स्टारप्रचारक म्हणून निवड झालेले नितीन शेंडे, तैनुर शेख यांची भारतीय पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल व जलतरण स्पर्धेत विविध पारितोषिक पटकाविले बद्दल सुभाष बर्गे यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
या व्यायामशाळेतील युवक खेळाडूंनी शरीर सौष्ठव स्पर्ध्येमध्ये जिल्हा पातळीवरील बक्षिसे पटकाविल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योजक दीपक कुदळे यांनी केले. शेवटी साहेबांना दीर्घआयुष्य लाभो म्हणून केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या.