कोण म्हणतं भ्रष्टाचार झाला, अहोऽऽ..आवामी महाज पॅनेल बहुमताने आला!
बँक गोर-गरीब, सर्वसामान्य नागरीकांची आर्थिक ङ्कतहानङ्ख आहे, तर रिक्षा ङ्कवाहनङ्ख आहे
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बारामती शहर अध्यक्षांचा दारून पराभव
बारामती(वार्ताहर): भागोऽऽ… विरोधी उमेदवार भागोऽऽ…वापस शेर (डॉ.पी.ए.इनामदार) आया!, कोण म्हणतं भ्रष्टाचार झाला, अहोऽऽ..आवामी महाज पॅनेल बहुमताने आला!, बँक गोर-गरीब, सर्वसामान्य नागरीकांची आर्थिक तहान आहे, तर रिक्षा वाहन आहे असे दि मुस्लिम को-ऑप बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीत डॉ.पी.ए.इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली आवामी महाज पॅनेला मिळत असलेले बहुमत पाहता, सर्वसामान्य, गोर-गरीब ज्यांना बँकेचा आधार आहे त्यांनी या वाक्यातून डॉ.पी.ए. इनामदार व त्यांच्या सर्व टीमचे भरभरून स्वागत व शुभेच्छा दिल्या.
काही उमेदवार गेल्या दोन वर्षापासून निवडणूकीच्या पार्श्र्वभूमीवर जागो..सभासद.. जागो, बँकेत भ्रष्टाचार झाला.. पी.ए.इनामदार हटाव असे हाताला चुना लावून बोंबलत होते. मात्र शेवटी बँकेच्या सभासदांनी या विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली.
निवडणूक लढविण्याचा व मतदान करण्याचा लोकशाहीने सर्वांना अधिकार दिला आहे. शिक्षणमहर्षी, इतिहास व सहकार तज्ञ डॉ.पी.ए.इनामदार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या कित्येक वर्षापासून बँकेचे कामकाज सुरू आहे. काहींनी निवडणूकीच्या तोंडावर बँकेला, बँकेच्या कामकाजासह पी.ए.इनामदार यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले होते. मात्र, विरोधकांचा जो प्रतिमा मलिन करण्याचा डाव होता तो दक्ष मतदारांनी हाणून पाडला आहे. या विरोधकांनी आम्ही, मी काय केले याबाबत मतदारांना सांगितले पाहिजे होते. मात्र बँकेत सुरू असलेला कारभार चोहाट्यावर आणून सभासदांमध्ये संभ्रम निर्माण केला होता.
एवढा विरोध, वेगवेगळे आरोप, प्रत्यारोप, कोर्ट कारवाई होत असताना डॉ.पी.ए.इनामदार यांनी आपला संयम ढासळू दिला नाही. कुठेही कडवी प्रतिक्रीया व्यक्त केली नाही विरोध केला नाही. त्याच्या म्हणण्यानुसार जर विरोधाला विरोध करीत बसलो असतो तर सभासद, ठेवीदारांनी तुम्ही बसा भांडत आम्ही आमचे पैसे घेतो काढून असे केले असते.
बारामती राजकीय पंढरी असल्याने येथील नागरीकांना मतदान करा म्हणून सांगावे लागत नाही. ते वेळात वेळ काढून मतदान करतातच, त्यानुसार बारामतीत एक हजार दोनशे मतांपैकी 900 च्या पुढे मतदान झाले. मताचा आकडा वाढल्याने विरोधकांना गुदगुल्या होत होत्या मात्र, निकाल बाहेर पडताच कोण किती पाण्यात आहे हे कळाले.
मुस्लिम बँक येड्या गबाळ्याच्या हातात देवून हजारो सभासदांचा तोटा करून चालणार नाही. उमेदवाराचे विचार काय, त्याची समाजात प्रतिमा काय याचा विचार सध्याचा दक्ष मतदार करीत आहे. कधी कोणाला चहा पाजला नाही असे जर उमेदवार निवडणूक लढवीत असतील तर मतदार विचार करूनच मतदान करतात. तो या बँकेच्या निवडणूकीतून समोर आले आहे. या निवडणूकीत दोन माजी चेअरमन व तीन विद्यमान संचालक पराभूत झालेले आहेत.