बारामती(वार्ताहर): आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, बारामती नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सत्यव्रत काळे यांच्यावतीने माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त 100 गरजू ज्येष्ठ नागरीकांना ब्लँकेट वाटप व महिलांना तुळजाभवानी यात्रा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमास बा.न.प.चे गटनेते सचिन सातव, आरोग्य समितीचे सभापती सूरज सातव, नगरसेवक नवनाथ बल्लाळ, गणेश सोनवणे, संतोष जगताप, बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सिद्धनाथ भोकरे, मुस्लिम बँकचे संचालक अल्ताफ सय्यद, निलेश इंगुले, निलेश पलंगे, इम्रान पठाण, सागर देशखैरे, सोमनाथ गजाकस, किरण क्षीरसागर, शैलेश वनवे, अनिल कदम, राकेश भैय्या वाल्मिकी, निलेश मोरे, रोहन माघाडे, निलेश शेंडगे, विक्रम शिर्के इ. शुभहस्ते व उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.

दि.15 डिसेंबर रोजी केक कापून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. दि.17 डिसेंबर रोजी माता भगिनींसाठी तुळजाभवानी यात्रेस बारामतीतून प्रस्थान केले होते. यावेळी संदीप आढाव, शुभम माने, मंगल पवार, गणेश पवार, लक्ष्मण जाधव इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल साळवे पाटील यांनी केले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आई प्रतिष्ठानचे दाऊद शेख, विकास गायकवाड, शुभम माने, नाना घाडगे, दीपक शिंदे, मंगल पवार, नागेश कासार, रफिक शेख, सुशांत काळे, विपुल काळे, युवराज काळे, राहुल सावंत, विजेंद्र काळे इ. मोलाचे सहकार्य केले.