अशोक घोडके यांजकडून..
इंदापूर(वार्ताहर): येथील हिंदू-मुस्लीमांचे प्रतिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्राच्या वैभवात भर घालणारे ऐतिहासिक अशा हजरत चॉंदशाहवली बाबांचा दर्गा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी लागेल तो निधी देणार असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
हजरत चॉंदशाहवली बाबांचा 457 वा ऊर्स मार्गशिर्ष 8 दि.11 डिसेंबर 2021 रोजी प्रारंभ झाला. भारतीय पंचांगातील मार्गशीर्ष या नवव्या महिन्यात साजरा केला जाणारा हा उरूस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीही शासनाच्या नियमांनुसार आणि अत्यंत साध्यापणाने मात्र पारंपारिक पद्धतीने साजरा होत आहे.
या उरुसाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन चादर चढविली. दर्शन घेतल्यानंतर लहान मुलांकरीता खेळणी खरेदी करून वाटप करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, नगरसेवक पोपट शिंदे, स्वप्नील राऊत, अनिकेत वाघ, सागर पवार, राहुल गुंडेकर, फकीर पठाण, हमीद आतार इ. मान्यवर उपस्थित होते.