अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): काझड (ता.इंदापूर) गावाच्या सर्वांगिण विकासाठी व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे करीत असलेल्या विकास कामाने प्रेरीत होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असल्याचे गावचे माजी सरपंच व दूधगंगाचे माजी संचालक कै.प्रकाश पाटील यांचे चिरंजीव सचिन नरुटे पाटील, भैरवनाथ विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष पै.सुरज पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ नरुटे- पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यानी बोलताना सांगितले.
पुणे येथे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
पक्ष प्रवेशानंतर बोलताना सचिन पाटील व सुरज पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस व खा.शदरचंद्रजी पवार यांचेबाबत असणारे आकर्षण, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, खा.सुप्रिया सुळे व ना.दत्तात्रय भरणे यांच्या तळागाळातील सर्वांगीण विकासाच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. पुढील काळात संपूर्ण काझड गावामध्ये राष्ट्रवादीमय वातावरण झाले शिवाय राहणार नाही. ना.भरणे मामांच्या मार्गदर्शनाखाली खंबीरपणे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मा.पंचायत समिती सदस्य बापूराव पाटील, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी पाटील, काझडचे सरपंच अजित पाटील, विद्यमान पंचायत समिती सदस्य दादासाहेब वणवे, काझड सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब म्हेत्रे, रतीलाल पाटील, दत्तात्रय पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील, मा.उपसरपंच बापूराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.