अभिजीत काळे मेंबर म्हणजे चालतेबोलते मदत केंद्र

मेंबर शब्द उच्चारला तर संबंधिताकडे इतरांचा बघण्याचा दृष्टीकोन म्हणजे कशाचे तरी लोकप्रतिनिधी असतील असा होतो. काही नगरसेवकांनी त्यांच्या कार्यकाळात एवढं काम केले की, आजही पद नसले तरी सर्वसामान्य नागरीकांनी दिलेली मेंबर ही पदवी कोणीही हिसकावून घेत नाही ती अजरामर ठरते असेच बारामतीचे सुपूत्र माजी नगरसेवक, महाराष्ट्र प्रदेश अजितदादा युवाशक्तीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत भिमराव काळे हे एक अपवाद आहेत. त्यांच्या 19 डिसेंबर रोजी साजरा होत असलेल्या वाढदिवसानिमित्त…

ज्या उद्देशाने त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेला अजितदादा नाव दिले त्या नावाला साजेसं असेच काम ते समाजात करीत आलेले आहेत. कोरोनाच्या काळात या अदृश्य शत्रु बरोबर सर्वांना लढा द्यावा लागला. यामध्ये हातावरचे पोट असणार्‍यांची खुप दयनीय अवस्था झाली होती. हे परिस्थिती, दृष्य अभिजीत मेंबर यांनी पाहिले, अनुभवले आणि तातडीने अजितदादा युवाशक्तीच्या वतीने भाजीपाला, धान्याची मदत उभी केली. सॅनिटायझर फवारणी केली. काहीवेळा सॅनिटायझर वाहन उपलब्ध न झाल्यास तातडीने स्वत: पाठीवर इले. हातपंप लावून त्यांनी सॅनिटायझर फवारणी केली. कोरोना काळात वाहतुक ठप्प झाल्याने पायी, सायकलवर इतर राज्यात जाणार्‍या कामगारांना भोजनाची व्यवस्था केली.

काहींना तर लॉकडाऊन मुळे स्वत:च्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळली हे समाजापुढे कसे दाखवायचे अशी अवस्था असताना त्यांनी ते कुटुंब हेरून त्यांना घरपोहच धान्य, भाजीपाला दिला हे पवित्र काम त्यांनी केले. विनामास्क कोणी फिरू नये म्हणून जनजागृती केली, नागरीकांना धीर दिला. मास्कचे वाटप केले. रक्तपेढीत रक्तपुरवठा कमी पडला तर स्वत: प्रथम रक्तदान केले.

गणपती उत्सवात जनजागृती, पालखीत वारकर्‍यांना पेयजल वाटप, पोलीसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात सहकार्यांसोबत रक्तदान करून आपण समाजाचं काही तरी देणं लागतो या उद्देशाने काम केले. मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मेंबरच्या कामाची दखल घेत कौतुक केले.

आपल्या नेत्यावर प्रेम जाहीर करताना त्यांनी स्वत:च्या रक्ताने अजितदादांना शुभेच्छा पत्र लिहिले. एवढी निष्ठा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व पक्षाच्या नेत्यांवर आहे. ते करीत असलेल्या सामाजिक कार्यामुळे त्यांना चालते-बोलते मदत केंद्र म्हणून संबोधले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!