बारामती(वार्ताहर): देशाचे भाग्यविधाते माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते कासम हसनभाई कुरैशी यांनी नव्याने सुरू केलेल्या साहेब सरकार या हॉटेलचे उद्घाटन गटनेते सचिन सातव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी ऍड.इनक्लाब शेख, नगरसेवक अमर धुमाळ, अतुल बालगुडे, गणेश सोनवणे, सुनिल सस्ते, समीर चव्हाण इ. मान्यवर उपस्थित होते.
कुरैशी समाजाने पारंपारीक व्यवसायाला कलाटणी देत हॉटेल व्यवसायात पर्दापण केले आहे. सततच्या कारवाई, मनस्ताप, आर्थिक नुकसानीला सामोरे जात समाज अधोगतीकडे चाललेला आहे. या सर्व बाबींचा विचार करीत कासम कुरैशी यांनी साहेब हॉटेल सुरू केल्यानंतर साहेब सरकार हॉटेलचे उद्घाटन करून समाजातील युवकांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
कासम कुरैशी हे पवारसाहेब, दादा व ताईंच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोउपयोगी कार्यक्रम राबवीत असतात. दर शुक्रवारी मशिदीबाहेर गोर-गरीबांना अन्नदानाचा उपक्रम राबवित असतात. हॉटेल साहेब पाठोपाठ साहेब सरकार हॉटेल सुद्धा बारामतीच्या चोखंदळ ग्राहकांमुळे प्रकाशझोत्यात आल्याशिवाय राहणार नाही असेही कासम कुरैशी यांनी सांगितले.