बारामती(वार्ताहर): प्रभाग क्र.17 मध्ये श्रमदान व प्लॉगिंग अभियान क्र.19 मध्ये सहभागी होण्यासाठी नगरसेविका सौ.मयुरी सुरज शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रभागात उत्साहात अभियान राबविण्यात आले.
दि.9 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8 वा. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, वडकेनगर ते पोस्ट ऑफिस रोड पर्यंत अभियान राबविण्यात आले.

या अभियानाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे शहरातील स्वच्छतेत प्रत्येक नागरीकांचा सहभाग महत्वाचा आहे. प्लॉगिंग म्हणजे चालताना, मॉर्निंग वॉक किंवा सायकलिंग करताना आपल्या नजरेस पडणारा सुका कचरा गोळा करणे तो नगरपरिषदेच्या संकलन वाहनास देणे किंवा टाकणे होय.
आपली बारामती स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी सर्वांनी सहभागी होऊन अभियान राबविण्याची गरज असल्याचे नगरसेविका सौ.मयुरी शिंदे यांनी सांगितले.
यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रभाग क्र.17 आमराई मधील महिला व पुरूष मोठ्या संख्येने अभियानात सहभागी झाले होते.
नगरसेविका मयुरी शिंदे यांनी या अभियानात सहभागी होण्याच्या आवाहनाला प्रभागातील महिला, पुरूषांनी सकारात्मक प्रतिसाद देत अभियानात सहभागी होऊन प्रभागाची स्वच्छता केली.