स्मॉल फायनान्स बँक केल्याने, सभासदांच्या मुलभूत अधिकारावर कोणताही परिणाम होणार नाही – डॉ.पी.ए.इनादमार

बारामती(वार्ताहर): स्मॉल फायनान्स बँकने सभासदांच्या मुलभूत अधिकारावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मुस्लीम को-ऑप बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील आवामी महाज पॅनेलचे सर्वेसर्वा डॉ.पी.ए.इनामदार यांनी बोलताना सांगितले.

बारामती येथे मुस्लीम को-ऑप बँक पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारार्थी आयोजित सभेत डॉ.पी.ए. इनामदार बोलत होते. यावेळी ऍड.आयुब शेख, अलीभाई इनामदार, नजीरभाई तांबोळी, अफजल खान, बागवान जमातीचे अध्यक्ष अस्लम बागवान, ऍड.करीम बागवान, हाजी युसूफ इनामदार, आलताफ सय्यद इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे इनामदार म्हणाले की, स्मॉल फायनान्स्‌ बँका अशा वित्तीय संस्था आहेत ज्या देशातील बँकींग सेवा उपलब्ध नसलेल्या भागात वित्तीय सेवा देतात. सध्याचा मिळत असलेल्या डिव्हीडंडचे शेअर्समध्ये रूपांतर होईल. विदेशी ठेवी ठेवता येतील. बँकेच्या शाखा उघडताना शासनाची कोणतीही परवानगी घ्यावी लागणार नाही. सभासदांचे हक्क व अधिकार कायम राहणार आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे काम करीत आहे. लहान बँका बंद करून फक्त मोठ्या बँका सुरू ठेवण्याचा निर्णय आहे.

जे स्मॉल फायनान्स्‌ बँक न होणेसाठी सध्या ओरडत आहे त्यांनी बँकेच्या वेळोवेळी झालेल्या मिटींगमध्ये याबाबत विचारले पाहिजे होते. पाच वर्षात फक्त 3 वर्ष मिटींगला उपस्थित राहिले. याबाबत त्यांनी कोर्टात सुद्धा दाखल केले तरी त्यास कोर्टाने स्थगिती दिली नाही. सर्वसाधारण सभेत मान्यता घेतली त्यावर सुद्धा यांनी स्थगिती घेतली तो निकाल प्रलंबित आहे.

बँकेबाबत बोलताना त्यांनी तारतम्य पाळले पाहिजे होते. यांनी काय केले हे सांगायचे होते. कोणीही संचालक मिटींग भत्त्याची मागणी करीत नाही पण या महाशयांनी भत्त्याची मागणी केली. मिटींगमध्ये समन्वय व संवाद न साधता माझा विरोध आहे असे सांगितले पाहिजे होते. याने स्वत:चाच विश्र्वासघात केलेला आहे. यांना मीपणा व दुसरे कोणी नको हा खूप मोठा एक आजार आहे. विरोधक पैसे खाल्ले म्हणतात. बँकेच्या फायद्यासाठी व एनपीए कमी करण्यासाठी व्यवहार केले. बँकांचे तीन वेळा ऑडीट होत असते. नियमानुसार बँकेची खातेदार, सभासदांची माहिती कोणालाही देता येत नाही. बँकेला झोपविण्याचा प्रयत्न या लोकांनी केला आहे. विरोधकांनी केलेल्या आरोपाला मी प्रतिउत्तर दिलेले नाही. मी कोणत्याही बँकेकडून आजपर्यंत कर्ज घेतलेले नाही. विरोधकांनी एवढे आरोप केले मात्र बँकेच्या ठेवीवर किंवा सभासदांवर कोणताही परिणाम झालेला नाही ही खूप मोठी बाब आहे. आझम कॅम्पसमध्ये 25 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सोसायटीचा चार्ज हाती घेतला त्यावेळी 7 हजार खात्यात रक्कम होती सध्या 150 कोटींचे बँक बॅलन्स आहे. कॅम्पसमध्ये 350 कोटीचे काम झालेले आहे. 27 हजार मुले शिक्षण घेत आहेत. 11 व्यावसायिक विभाग सुरू आहे. एकाच ठिकाणी तीन ज्युनइर कॉलेज आहेत.

या कॅम्पसमधील मुले ड्रोन, मोबाईल व कॉम्प्युटर बनवून हाताळतात. 27 ऊर्दु व 10 मराठी शाळांना येथुन इंग्रजीचे शिक्षण दिले जाते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी टिकला पाहिजे. त्यासाठी चांगली लोकं त्याठिकाणी गेली पाहिजे. धर्मप्रसाराबरोबर समाजातील घडामोडीचे ज्ञान धर्मगुरूंना व्हावे म्हणून त्यांना कॉम्प्युटर, मोबाईल व ड्रोनचे ज्ञान व क्रीडा क्षेत्रात सुद्धा प्रगती करीत आहेत. आतापर्यंत 450 धर्मगुरूंना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

आपल्याला कशावर काम करायचे आहे त्याचा प्रथम ताळेबंद बनविण्याची गरज आहे त्याची सुरूवात आपल्या कुटुंबापासून सुरू करा असेही ते म्हणाले. दुसर्‍यांवर बोलत राहिला तर काही मिळणार नाही. प्रथम शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करून आर्थिक व आरोग्य क्षेत्रात सुद्धा काम करून नागरीकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या उज्वल भविष्याचा विचार करून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. बोलणार्‍याने प्रथम स्वत:कडे बोट दाखून बोलावे. बँक तुमची आहे त्यामुळे स्वच्छ व चांगले काम करणार्‍यांना निवडून द्या असेही शेवटी ते म्हणाले.

डॉ.पी.ए.इनामदार यांचा बागवान, कुरेशी, मोमीन, झारी, तांबोळी, आतार जमात व चॉंदशाहवली दर्गाचे ट्रस्टींतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी ऍड.करीम बागवान यांनी मनोगत व्यक्त केले व आवामी महाज पॅनेलला 100 टक्के मतांनी निवडून द्या असे उपस्थित सभासदांना सांगितले. ऍड.आयुब शेख यांनी मतदान करताना घ्यावयाचा काळजी व सर्व मतपत्रिकेवर रिक्षा हे चिन्ह पाहुन 17 शिक्के मारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सभेचे प्रास्ताविक कमरूद्दीन सय्यद यांनी केले. सुत्रसंचालन मुस्लीम बँकेचे उमेदवार आलताफ सय्यद यांनी केले तर शेवटी आभार सुबहान कुरेशी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!