संजय गांधी योजनेची 134 प्रकरणे मंजूर

बारामती(उमाका): संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी 25 नोव्हेंबर 2021 प्रशासकीय भवन बारामती येथे झालेल्या बैठकीत 134 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत तहसिलदार विजय पाटील, नायब तहसिलदार महादेव भोसले समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, जिवना मोरे शिवराज माने, नुसरत इमामदार, शहाजी दळवी, लालासो होळकर, अशोकराव इंगुले आदी उपस्थित होते. बैठकीत एकूण 144 अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये संजय गांधी योजनेच्या 75 प्राप्त अर्जापैकी 72 मंजूर तर 3 अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेचे 58 प्राप्त अर्जापैकी 51 अर्ज मंजूर तर 7 अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी योजनेचे आणि राष्ट्रीय कुटुंब योजनेचे सर्व प्राप्त अर्ज अनुक्रमे 5आणि 6 मंजूर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!